Thursday, June 25, 2020

mati

वर्धनगड च्या मुलांबरोबर (LFH) मध्ये माती हा विषय ठरला. मातीवर अभ्यास करायचे आहे असे मुलांना सांगीतल्यावर माती बद्द्ल मुलांकडुन आलेले प्रश्न:
१.माती कशी, कशापासुन, कधी, कशामुळे तयार झाली???
२. मातीचा शेतकर्यांना , झाडांना कसा फायदा होतो??
४. माती पासुन काय, काय बनवीता येते?
५. मातीचे प्रकार कोणकोणते??
६. मातीचे रंग कोणकोणते व ते तीला ते कश्यामुळे आले???

या सर्व प्रश्नांवर आमची चर्चा झाली, व उत्तरे शोधण्यासाठी एक एक कडी सोडवण्याचा प्रयत्न झाला. जो इथे लिहीत आहे.


पहिल्या प्र्श्नांवर झालेली चर्चा या कडीमध्ये:


माती खडकांपासुन झाली पण खडक कसा तयार झाला???


खडक होण्याची प्रक्रिया: 


आक्रुतीत दाखवल्या प्रमाणे खडकांची निर्मिती होते. खडकांची निर्मिती ही अतीशय हळु होणारी नैसर्गीक प्रक्रिया आहे.


खडकांचे विवीध प्रकार त्यांच्यामध्ये असलेल्या खनिजांमुळे, त्यांच्या आकारावरुन, तयार झालेल्या पद्धतीवरुन पडलेले आहेत जे इथे लिहित आहे.

१. अग्निजन्य दगड:   ज्वालामुखींच्या उद्रेकातुन आलेला लाव्हारस थंड होऊन तयार झालेला हा मुळ दगड आहे.
उदाहरण : बसाल्ट खडक.
२. स्तरीत दगड:  दगडांचे विदारण , झीज झाल्यावर मातीचे, गाळाचे थर साचून साचून व दाब पडुन तळाला जो दगड तयार होतो त्याला स्तरीत दगड म्हणतात.
उदाहरण :, वालुकाश्म, चुनखडक. 
३. रुपांतरीत दगड:  हवामानातील बदलांमुळे दगडांवर जी नैसर्गिक प्रक्रीया होते, त्यामुळे रुपांतरीत दगडाची निर्मीति होते.
 उदाहरण : जांभा, संगमरवर.



ज्वालामुखी म्हणजे काय़?:
भुगर्भातील सतत होणार्‍या हालचालींमुळे ज्वालामुखीच्या उद्रेकातुन भुगर्भातील तप्त शीलारस, धुळ, धुर बाहेर पडतात.

ज्वालामुखी बद्दल अधिक माहिती साठी...
https://www.youtube.com/watch?v=fgiaKkf_E6A

लाव्हारस पृथ्वीच्या आत कुठुन आला , पृथ्वीच्या आत काय आहे????? 

भुगर्भ आवरने:


१)गाभा (core)- पृथ्वीच्या मध्यभागात म्हणजे तीच्या पोटात असलेल्या भागाला पृथ्वीचा गाभा म्हणतात, हा लोखंड आणी निकेल ह्या खनिजा पासुन बनलेला आहे. पृथ्वीचा गाभा अतिशय तप्त आहे. गाभ्याचे दोन विभाग आहेत. सगळ्यात आतल्या भागाला आंतर गाभा (inner core)म्हणतात, तो अती तप्त असुनही त्यावरील प्रचंड प्रमाणात असलेल्या दाबामुळे तो घन स्वरुपात आहे, व त्याच्या बाह्य आवरणाला बाह्यगाभा (outer core) म्हणतात. जो तप्त व द्रव स्वरुपात आहे.

२) प्रावरण (mantel): मध्यभागाकडुन वरची आवरणे बघताना, बाह्यगाभ्याच्या बाहेरील आवरणाला प्रावरण असे म्हणतात.  हे द्रव किंवा दगडासारखे कठिण नसुन प्लास्टीक सारखे मऊ आहे. हा मुख्यत्वे मॅग्नेशियम, लोह आणि सिलिकेट ह्या खनिजांपासुन बनलेले आहे.

३)शीलावरण (crust):  प्रावरणाच्या वरच्या म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या बाह्य आवरणाला शीलावरण असे म्हणतात. हे आवरण वेगवेगळ्या खनिजांपासुन तयार झालेल्या दगडांनी म्हणजेच शीलांपासुन बनलेले आहे.

अधीक माहीती साथी. (माहिती इंग्लिश मध्ये आहे, समजुन घेण्याचा प्रयत्न करावा.)
https://www.nationalgeographic.org/media/earths-interior/

अश्याप्रकारे भुगर्भात विवीध प्रकारची खनिजे प्रतेक आवरणात आढळतात. ही सर्व प्रकारची खनिजे जेंव्हा ज्वालामुखीच्या उद्रेकातुन बाहेर पडतात. तेव्हा ह्याच खनीजांपासुन दगड निर्माण होतात.

संदर्भ सुची:
1. निसर्ग शाळा,  पर्यावरणविषयक  उपक्रम , Oikos for ecological services , ग्राम मंगल
2. https://www.youtube.com/watch?v=h3Ti7FD1MUM
3. wikipedia
4. https://mr.vikaspedia.in/