Sunday, August 2, 2020

माती अभ्यासक्रम


शाळेची जैवविविधता नोंदवही (CBR) म्हणजे काय?

माती


१.  खडकांचे प्रकार- दिवस १-२
खडकांचे प्रकार, खडक ओळखण्याच्या खुणा, खडकांची झीज, खडकांचे परिसराशी नाते , खडकांचे उपयोग,

https://www.youtube.com/watch?v=h3Ti7FD1MUM

२. मातीचे प्रकार:  दिवस ३

सहयोगि शिक्षकाने गावातुन ३ ते ५ वेगवेगळ्या ठीकाणची साधारण १ किलो माती आणावी.
१. ओठ्याकाठची माती.
२. नदीकाठची माती.
३. शेतातील माती
४.शाळेच्या आवारातील माती
५. रस्त्याच्या कडेची माती
६. माळरानाची माती

मुलांनी वरच्या मातीचे निरिक्षण करावे.

निरिक्षण:
१. मातीचा रंग
२. वास
३. स्पर्श
४. मातीतील घटक- भिंगाने मातीतील घटकांकडे बघावे, छोटे दगड, मातीचे कण, वाळू, झाडांची मूळॆ, किडे, गांडुळ, बीया, छॊटे शंख, झाडांच्या पानांचे तुकडे

३. जमिनिच्या स्तरांचे निरिक्षण: दिवस ४-५
जमिनिचा छेद आक्रुति
https://slideplayer.com/slide/15512602/


कठिण दगड, छोटे दगड , दगडांचा भुगा, त्यानंतर काळी , लाल माती, व सगळ्यात वर पालापाचोळा,

१. माती कशापासुन तयार होते?
२. आपण खडक घेवुन भुगा केला तर माती तयार होईल का?
३. आपण जी माती बघतो त्यात दगडांच्या व्यतीरिक्त काय काय असते?
४.माती तयार होण्य़ाच्या प्रक्रियेला किती वेळ लागतो हे विचारवे ?  (५, ५०, १०० वर्ष) , सांगावे.  मातीचा २ से. मी चा थर व्हायला

जमीन एक गाळण: दिवस ६
प्रयोग:  मातीची पाणीधारणक्षमता
शिक्षकाने  वाळू , चिकणमाती, शेतातली माती याचे नमुने . प्लास्टीकच्या ३ किंवा १ छिद्र असलेली बाटली प्रयोगाकरीता तयार ठेवावी.
या प्रयोगावरुन मुलांना मातीच्या प्रकारांची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वेगवेगळी असते हे कळेल.

माती कशी तयार होते: दिवस ७
शाळेच्या परिसरातील ३ मेडीयम , छोटे  कठीण दगड शोधुन आणावेत.

छोट्या दगडाने मुलांना काळजीपुर्वक मोठा दगड फ़ोडायला सांगावे.

खडक फ़ोडणे किती अवघड आहे हे मुलांनी अनुभवल्यावर त्यांना सांगावे, दगडापासुन नैसर्गीकरित्या माती तयार होण्यासाठी  ३०० ते ५०० वर्षे लागतात.
माती तयार होण्यासाठी खडकावर कोण्कोणत्या नैसर्गीक, भौतीक, रासायनीक प्रक्रिया होतात हे मुलांना सांगावे.

मातीचे विवीध प्रकार व त्यांचे उपयोग : दिवस ८
खडकांचे प्रकार आठावा
जांभा दगड  निर्मीति
महाराष्ट्रातील विवीध प्रदेश (समुद्र किनारा, डोंगर, पठार(डोंगराळ), देशाचा प्रदेश (पठार) आणी तेथील मातींचे प्रकार
आपल्या गावातील मातीचे नमुने
नदीकिनारी मिळणारी सुपीक माती
मातीचे विवीध प्रकार व प्र्तेक मतीचे गुणधर्म




भारतातील खनिजांची तोंडओळख:   दिवस ९

खनिज म्हणजे काय?
खडकापासुन भारतात मिळणारी धातु आणी अधातु खनीजे आणी भारतातील त्यांच्या खाणी.


जमिनीची धुप: दिवस १०
जमिनीची धूप म्हणजे काय आणी त्याची कारणे आणी जमिनीची धूप थांबवण्यासाठिचे उपाय.
शिक्षकाने जमिनीची धूप आपल्या गावात कुठे होते याची उधाहरणे मुलांना सांगावित.
उदाहरणार्थ:  ओठ्याकाठची जमीन, डोंगरावरची जमीन,  डोंगर पायथ्याची जमीन.

माती संवर्धणाची तंत्रे: दिवस ११
माती संवर्धणासाठी आपण काय काय करु शकतो?
ओहोळ, घळ, ऊतार ह्या जागी माती संवर्धणासाठी करावयाचे तंत्रे

मातीचे प्रदूषण: दिवस १२
आज मातीचे खुप मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे.


माती दूषित होण्याची कारणे
https://vishwakosh.marathi.gov.in/27303/

प्रदुषणाची कारणे व ऊपाय
BIOREMEDIATION-
mycoremediation
Phytoremediation

भूस्खलन म्हणजे काय ?
https://mr.vikaspedia.in/social-welfare/90692a92494d924940-93594d92f93593894d92593e92a928-1/92d94293894d91693292893e91a947-90692a92494d924940-93594d92f93593894d92593e92a928

माळीण गावातील दरड दुर्घटना
https://mr.vikaspedia.in/social-welfare/90692a92494d924940-93594d92f93593894d92593e92a928-1/92e93e933940923-91793e93593e924940932-926930921-92694193094d91891f92893e-91593e93092392e93f92e93e90293893e#section-2


संदर्भ सुची:
गग
निसर्ग शाळा,  पर्यावरणविषयक  उपक्रम ,
ओइकोज , ग्राम मंगल

Wednesday, July 29, 2020

मातीची प्रश्नावली

मातीची प्रश्नावली

रिकाम्या जागा भरा

१. मातीचा २ से. मी चा थर व्हायला जवळ जवळ ------ ते ------- वर्ष लागतात.

२. मातीची पाणीधारणक्षमता म्हणजे मातीचा ----------------- ठेवण्याचा गुणधर्म होय.

३. महाराष्ट्रातील विवीध भुप्रदेश व तीथली मातीच्या रिकाम्या जागा भरा :

समुद्र किनारा, - ----------

कोकणामध्ये -------

डोंगर/ देश / पठार /, - --------

पठार (डोंगराळ)-  ----------------




खालील प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे लिहा:

१. खडक होण्याच्या प्रक्रियेची आक्रुति काढा?

२. खडकांचे प्रकार लिहा व त्यांची प्रतेकी एक एक उदाहरणे लिहा.

३. ज्वालामुखी म्हणजे काय़, आणी ज्वालामुखीच्या उद्रेकातुन काय काय बाहेर पडते हे आक्रती काढुन स्पष्टीकरण सांगा?

४. जमिनीची धुप म्हणजे काय व त्यन्चे उपाय लिहा?

५. मातीचे प्रदुषण म्हणजे काय़ व त्यांचे उपाय लिहा?

६. भुगर्भ आवरणे आक्रुति काढा आणी प्रतेक आवरणांना नावे द्या?

६. खनिज म्हणजे काय़ ?

७.जैवीक थरामध्ये काय काय असते?




mati2

जमिनीची धुप:



भुपृष्ठ भागावरील  माती एका ठिकाणावरुन दुसर्‍या ठिकाणी वाहुन जाण्याची क्रिया होते तेंव्हा जमीनिची धूप झाली असे म्हणतात. ही धूप होण्याची अनेक नैसर्गीक तसेच  मानवी कारणे आहेत. नैसर्गीक कारणे म्हणजेअति्व्रुष्टी, पाण्याचे प्रवाह , वादळ, वारा, हिमनद्या ह्यामुळे प्रुथ्वीच्या भुपृष्ठ भागावरील माती वाहुन जाते.



https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A4%A3



उदाहरणार्थ:  ओठ्याकाठची जमीन, डोंगरावरची जमीन,  डोंगर पायथ्याची जमीन.





मानवी कारणे:

माणसांकडुनही प्रुथ्वीचे खनन होते व वेगवेगळ्या कारणांसाठी एका ठिकाणची माती दुसर्‍या ठिकाणी वाहुन नेली जाते.तसेच शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, अतीरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते.





शिक्षकाने जमिनीची धूप आपल्या गावात कुठे होते याची उधाहरणे मुलांना सांगावित.



माती संवर्धणाची तंत्रे:



माती संवर्धणासाठी आपण काय काय करु शकतो?



नैसर्गीक कारणांनी जी जमिनीची धूप होते ते थांबवण्यासाठिचे उपाय:

१. जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरविले जाईल किंवा शोषले जाईल व भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होईल अशी व्यवस्था करावी.

२. जंगल तोड होवु देवु नये, किंवा झाली असेल तर विचार्पुर्वक धुप थांबवण्यासाठी लावली जाणारी देशी झाडे लावावी. पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून जमिनीवर वृक्षांची लागवड करावी. कोणत्याही ठिकाणी, गावात जिल्ह्यात, राज्यात सर्वत्र एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्र जंगलाखाली असावे, असा पर्यावरणाचा नियम आहे. कारण त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.

३.  ताली बांधणे, बांध घालणे, बंधारे धरणे बांधणे, पाझर तलाव बांधणे व उताराला आडव्या दिशेने ताली घालणे,

४. पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे स्थापन घडवून आणण्याची व्यवस्था करावी. पिकांची फेरपालट करून वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घ्यावीत.





शेतासाठी मानवी कारणांनी जी जमिनीची धूप होते ते थांबवण्यासाठिचे उपाय::



5.अतीरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते. ती कमी करण्यासाठी विशीष्ट गवताची लागवड फायदेशीर ठरते. या गवताचा उपयोग दुभत्या गुरांना हिरवा चारा म्हणून तर होतोच; शिवाय जमिनीवर गवती आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप थांबते.

6.पिकांना, वनस्पतींना गरजेपुरताच पाणी पुरवठा करावा. ठिबक सिंचनाणे 90% पाण्याची बचत होते, त्याला उत्तेजन द्यावे.

7. पट्टा पेर पद्धतीचा वापर करून सर्वत्र सलग एकच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या पट्ट्यांमधून घ्यावीत.

8. शेतीसाठी करावयाच्या संपूर्ण मशागती, जसे नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी इ. उताराच्या आडव्या व समपातळी रेषेत समांतर करावी.

9. उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी समपातळीतील बांधबंदिस्ती, ढाळीचे वरंबे , उताराला आडवे वाफे, पायऱ्यांचे मजगीकरण, नाला विनयन, तसेच समपातळीत चर खोदणे या उपाययोजना कराव्यात.

10. धूपनियंत्रण करण्यासाठी भुईमूग, मटकी आणि कुळीथ ही पिके अत्यंत कार्यक्षम आहेत.







मातीचे प्रदूषण:
आज मातीचे खुप मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे.



प्रदुषणाची कारणे व ऊपाय

कारणे:

१. रासायनिक खते व कीटनाशके यांचा अतिरेकी यांचा वापर-

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मृदा नापीक होते. मातीतील पिकांना आवश्यक उपयुक्त जीवजंतु मरून जातात. शेतीतील पिकांना पाणी देताना पिकांसाठी वापरलेली विषारी रासायनिक द्रव्य पावसाच्या पाण्यात मिसळून उतरणे वाहून जातात. व नद्या ओढे, तलाव यांना जाऊन मिळतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते. भारतात ऊसाच्या पिकाला अति पाणी व अतिरसायनिक खते वापरल्याने जमिनी नापीक व चोपड बनत चालल्या आहे. कीटकनाशकातील टाकाऊ घटकांमध्ये हायड्रोजन सल्फाइड व सल्फरडाय ओक्साईड हे वायु तयार होऊन जमिनीतून दुर्गंधी येते.

२. शेतीतील आधुनिक मशागत पद्धती

३.औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम :
उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, अविघट्नशील कचरा व वापरात न आणलेल्या रसायनिक टाकाऊ घटकांच्या मिश्रणातून मातीचे नापीक होणे.

४. सांडपाण्याचा योग्य निचरा न केल्यामुळे , मृदेच्या प्रदूषनामुळे रोगांच्या साथी पसरतात

५. उद्योगधंद्यातील हानिकारक किरणोस्तारी पदार्थ हे जलचर व जमीनीवरील वनस्पति, पिके यांच्या उत्पादनाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यात कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इ. समावेश होऊन रोग पसरतात व मृत्यू होतो.

५.वनस्पती/ जंगलतोडीचे परिणाम : जगात सर्वत्र कारखाने, वस्त्या, विविध प्रकल्पांच्या विकासासाठी शेतजमीनिवर व जंगल क्षेत्रावर आक्रमण झाले. व शेती क्षेत्र व जंगलक्षेत्र घटले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू शकत नाही. जंगले घटल्याने भुपृष्टावरील हवामानात बदल होतो व तापमान वाढते. जमिनी ओसाड पडतात. असहय उष्णतेने अनेक जीव बळी जातात. जमीन कोरडी नापीक होते. प्राणवायू व कार्बन डाय ओक्साइड यांचा समतोल ढासळतो.

उपाय:

१,जलसंचयन व वनस्पति व जंगल क्षेत्रात वाढ करणे

२, कचर्याचे वर्गीकरण योग्य तर्‍हेने करणे, प्लास्टीक संसाधनांचा कमीत कमी वापर व पुन्र्वापर करणे. व अविघटनशील कचर्‍याची योग्य तर्‍हेने विल्हेवाट लावणे.

३.जमिनीची धूप थांबवण्यासाठी योग्य पद्धतीने ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजना आखणे

४. शेतीची योग्य मशागत पद्धती व शेती सिंचन : पिकांना त्यांच्या गरजे पुरतेच पाणी द्यावे पिकांच्या पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. शेतीला अतिरिक्त पाणी देऊन ते वाया घालऊ नये, पिकांचे नुकसान करू नये. शेतीतील पिके आलटून पालटून घेताना कस, मातीची सुपीकता वाढेल अशी पिके घ्यावीत. शेतीची मशागत उतारच्या दिशेने करू नये. नांगरणी, पेरणी आडव्या दिशेत करावी. शेतात सलग एकाच एक पीक घेऊ नये. मशागत आडव्या दिशेने करावी. जमिनीवर गवतांचे व वनस्पतीचे आच्छादन वाढवावे. मृदा सुपीक, निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत, नैसर्गिक खत वापरावे.


https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3

https://vishwakosh.marathi.gov.in/27303/





भूस्खलन म्हणजे काय ?

https://mr.vikaspedia.in/social-welfare/90692a92494d924940-93594d92f93593894d92593e92a928-1/92d94293894d91693292893e91a947-90692a92494d924940-93594d92f93593894d92593e92a928



माळीण गावातील दरड दुर्घटना

https://mr.vikaspedia.in/social-welfare/90692a92494d924940-93594d92f93593894d92593e92a928-1/92e93e933940923-91793e93593e924940932-926930921-92694193094d91891f92893e-91593e93092392e93f92e93e90293893e#section-2



संदर्भ सुची:
1. निसर्ग शाळा,  पर्यावरणविषयक  उपक्रम , Oikos for ecological services , ग्राम मंगल
2. https://www.youtube.com/watch?v=h3Ti7FD1MUM
3. wikipedia
4. https://mr.vikaspedia.in/

Tuesday, July 21, 2020

mati 1



यापुर्वीच्या भागात दगड कसा बनला हे आपण पाहीले, आता त्या पासुन मातीचा जन्म कसा झाला ते पाहुया.


दगड खनिजांपासुन बनला पण खनिज म्हणजे नेमकं काय ते पाहुया !

१. भारतातील खनिजांची तोंडओळख: 

खनिज म्हणजे काय?.

आपली पृथ्वी ही अनेक मुलद्रव्यांनी बनलेली आहे. तिच्या प्रतेक आवरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुलद्रव्ये आहेत. पृथ्वीवरचे दगड हे विवीध मुलद्रव्यांनी बनलेले असतात.
हि मुलद्रव्ये दगडांमध्ये अशुध्द स्वरुपांमध्ये आढळतात. मानवाने वेगवेगळे धातु वआधातु मिळवण्यासाठी  वेगवेगळ्या खाणी खणल्या आहेत. कारखान्यामध्ये हे अशुध्द  स्वरुपातील खनिज विवीध प्रक्रिया करुन त्यापासुन वेगवेगळी मुलद्रव्ये  धातु आणि अधातु स्वरुपात वेगळी केली जातात. आपण वापरत असलेल्या सर्व धातुच्या व काही अधातुच्या वस्तु बनवण्यासाठी बर्याच प्रमाणात जंगलतोड आणि खोदकाम केले जाते.


२. जमिनिच्या स्तरांचे निरिक्षण:
जमिनिचा छेद आक्रुति



या थरामध्ये आपल्याला कठिण दगड, छोटे दगड , दगडांचा भुगा, त्यानंतर काळी , लाल माती, व सगळ्यात वर पालापाचोळा, असे क्रमाने दिसते.

सगळ्यात वरचा थर हा मातीचाआहे.  दगडांची झीज होवुन माती तयार होण्याच्या नैसर्गीक प्रक्रियेला बराच काळ लागतो. ऊन, पाऊस थंडी ह्या हवामानाच्या बदलांमुळे दगडांवर भेगा पडतात, भेगांमध्ये पाणी मुरुन , अनेक रासायनीक आणि भौतीक बदलांनी दगडापासुन मातीचा जन्म होतो. मातीचा २ से. मी चा थर व्हायला जवळ जवळ ५०० ते १००० वर्ष लागतात. मुलांनी स्वतः  छोट्या दगडाने  काळजीपुर्वक मोठा दगड फोडायचा निष्फळ प्रयत्न केला आहे.
मातीच्या सगळ्यात वरचा थर हा जैवीक थराचा असतो, ह्या थरामध्ये. झाडांचा पालापाचोळा , तुटलेल्या फांद्या, मेलेली झाडे व प्राण्यांचे अवशेष, त्यांची मल-विष्टा मिसळली जाते. हे सगळे जीवाणु आणी बुरशीच्या सहाय्याने कुजुन त्याचे विघटन होऊन त्याची परत माती् होते. ह्याप्रकारे मातीत जैवीक थर मिसळल्यामुळे माती चांगली कसदार व सम्रुद्ध होते. मातीत अश्या प्रकारे ह्युमस वाढल्याने सर्वच झाडांना चांगले पोषण मिळते. म्हणुनच जंगलातील माती जास्त सम्रुद्ध आणि जीवंतअसते. मातीत असलेले सुक्ष्म जीवाणु , असंख्य किडे , मुंग्या, गांडुळे ह्या सर्वांमुळे माती अधिक भुसभुशित होते. त्यामुळे मातितील औक्सिजन वाढतो. सर्व जीवांना आणि झाडांच्या मुळांना जे हीतकारकच असते. ह्या सगळ्यांमुळे आपली जमिन नांगरुन पण निघते आणि त्यात खत पण मिसळले जाते.




३. मातीचे प्रकार:

निरीक्षणाकरिता मुलांनी ह्या प्रतेक ठीकाणावरुन मुठभर माती आणली.
१. तळ्याकाठ्ची माती.
२. शेतातील माती
३.शाळेच्या आवारातील माती
४. रस्त्याच्या कडेची माती
५. माळरानाची माती

मुलांनी वरच्या मातीचे निरिक्षण करुन, तक्त्यामध्ये त्यांच्या नोंदी लिहिल्या.

निरिक्षण:
१. मातीचा रंग
२. वास
३. स्पर्श
४. मातीतील घटक- भिंगाने मातीतील घटकांकडे बघावे, छोटे दगड, मातीचे कण, वाळू, झाडांची मूळॆ, किडे, गांडुळ, बीया, छॊटे शंख, झाडांच्या पानांचे तुकडे



४. जमीन एक गाळण:
प्रयोग:  मातीची पाणीधारणक्षमता
साहित्य:   वाळू , चिकणमाती, शेतातली माती याचे नमुने . प्लास्टीकच्या ३ किंवा १ छिद्र असलेली बाटली प्रयोगाकरीता तयार ठेवावी.  पाणी जमा करण्याकरता रिकामी भांडे, वेळ मोजण्यासाठी स्टॉपवॉच .



क्रुती:  वर सांगितलेल्या बाटलीमध्ये प्रतेक वेळी मातीचा एक प्रकार घालुन प्रयोग करायचा आहे. प्रयोग सुरु करण्यापुर्वी स्टॉपवॉच चालु करुन माती भरलेल्या बाटलीमध्ये पाणी घालायचे आहे, खाली रिकामी भांडे ठेवुन त्यात किती पाणी पडले व त्याला किती वेळ लागला ह्या दोन नोंदी करुन आपल्याला तक्ता करायचा आहे.

या प्रयोगावरुन मुलांना मातीच्या विवीध प्रकारांची,  पाणी धरुन ठेवण्याची क्षमता ही वेगवेगळी असते हे कळेल.  ह्या प्रयोगातील मातीचे नमुने हे मातीच्या प्र्तेक कणांचे आकारमान वेगवेगळे असल्यामुळे झाला आहे.  कणांच्या आकारमानामुळे त्यांचा पाणी धरुन ठेवण्याचा गुणधर्म कसा बदलतो हे ह्या प्रयोगातुन तडपाळुन पाहता येईल. मातीच्य ह्या पाण्याचा निचरा होणार्‍या किंवा पाणी धरुन ठेवणार्‍या ह्या गुणधर्माचा उपयोग करुन माणसांनी त्यानुसार विवीध झाडे लावणे ,पीक घेणे शिकले आहे.


मातीचे विवीध प्रकार त्यांच्या भुभागांप्रमाणे  :

मुलांनी भुगोलामध्ये हे शिकले आहे  कि प्रतेक ठिकाणचा भुप्रदेश हा त्या ठिकाणाला लाभलेल्या हवामानामुळे, त्याच्या स्ठानामुळे, तिथे आढळणार्‍या खडकांमुळे वेगवेगळा आहे.

आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगल्या भुभांगांकडे आणि तेथे आढळणार्‍या माती बद्दल जाणुन घेऊया.

महाराष्ट्रातील विवीध भुप्रदेश व तीथली माती :
समुद्र किनारा, - वालुकामय कोरडी
कोकणामध्ये -लाल माती
डोंगर/ देश / पठार /, - काळी माती---------- खनिजे- लोह, अल्युमिनीयम , मग्नेशियम
पठार(डोंगराळ- सह्याद्रीच्या डोंगराळ भाग व तीथली पठारे - लाल माती -खनिजे- लोह, अल्युमिनीयम

नदीकिनारी - गाळाची सुपिक माती.



मातीचा असा अभ्यास केला तर, आपल्या गावातील माती कशी आहे आणी का आहे हे कळेल. व या प्रकारामुळे आपल्या भागांमध्ये कोणकोणती झाडे छान येतील ते कळेल.

संदर्भ सुची:
1. निसर्ग शाळा,  पर्यावरणविषयक  उपक्रम , Oikos for ecological services , ग्राम मंगल
2. https://www.youtube.com/watch?v=h3Ti7FD1MUM
3. wikipedia
4. https://mr.vikaspedia.in/


Thursday, June 25, 2020

mati

वर्धनगड च्या मुलांबरोबर (LFH) मध्ये माती हा विषय ठरला. मातीवर अभ्यास करायचे आहे असे मुलांना सांगीतल्यावर माती बद्द्ल मुलांकडुन आलेले प्रश्न:
१.माती कशी, कशापासुन, कधी, कशामुळे तयार झाली???
२. मातीचा शेतकर्यांना , झाडांना कसा फायदा होतो??
४. माती पासुन काय, काय बनवीता येते?
५. मातीचे प्रकार कोणकोणते??
६. मातीचे रंग कोणकोणते व ते तीला ते कश्यामुळे आले???

या सर्व प्रश्नांवर आमची चर्चा झाली, व उत्तरे शोधण्यासाठी एक एक कडी सोडवण्याचा प्रयत्न झाला. जो इथे लिहीत आहे.


पहिल्या प्र्श्नांवर झालेली चर्चा या कडीमध्ये:


माती खडकांपासुन झाली पण खडक कसा तयार झाला???


खडक होण्याची प्रक्रिया: 


आक्रुतीत दाखवल्या प्रमाणे खडकांची निर्मिती होते. खडकांची निर्मिती ही अतीशय हळु होणारी नैसर्गीक प्रक्रिया आहे.


खडकांचे विवीध प्रकार त्यांच्यामध्ये असलेल्या खनिजांमुळे, त्यांच्या आकारावरुन, तयार झालेल्या पद्धतीवरुन पडलेले आहेत जे इथे लिहित आहे.

१. अग्निजन्य दगड:   ज्वालामुखींच्या उद्रेकातुन आलेला लाव्हारस थंड होऊन तयार झालेला हा मुळ दगड आहे.
उदाहरण : बसाल्ट खडक.
२. स्तरीत दगड:  दगडांचे विदारण , झीज झाल्यावर मातीचे, गाळाचे थर साचून साचून व दाब पडुन तळाला जो दगड तयार होतो त्याला स्तरीत दगड म्हणतात.
उदाहरण :, वालुकाश्म, चुनखडक. 
३. रुपांतरीत दगड:  हवामानातील बदलांमुळे दगडांवर जी नैसर्गिक प्रक्रीया होते, त्यामुळे रुपांतरीत दगडाची निर्मीति होते.
 उदाहरण : जांभा, संगमरवर.



ज्वालामुखी म्हणजे काय़?:
भुगर्भातील सतत होणार्‍या हालचालींमुळे ज्वालामुखीच्या उद्रेकातुन भुगर्भातील तप्त शीलारस, धुळ, धुर बाहेर पडतात.

ज्वालामुखी बद्दल अधिक माहिती साठी...
https://www.youtube.com/watch?v=fgiaKkf_E6A

लाव्हारस पृथ्वीच्या आत कुठुन आला , पृथ्वीच्या आत काय आहे????? 

भुगर्भ आवरने:


१)गाभा (core)- पृथ्वीच्या मध्यभागात म्हणजे तीच्या पोटात असलेल्या भागाला पृथ्वीचा गाभा म्हणतात, हा लोखंड आणी निकेल ह्या खनिजा पासुन बनलेला आहे. पृथ्वीचा गाभा अतिशय तप्त आहे. गाभ्याचे दोन विभाग आहेत. सगळ्यात आतल्या भागाला आंतर गाभा (inner core)म्हणतात, तो अती तप्त असुनही त्यावरील प्रचंड प्रमाणात असलेल्या दाबामुळे तो घन स्वरुपात आहे, व त्याच्या बाह्य आवरणाला बाह्यगाभा (outer core) म्हणतात. जो तप्त व द्रव स्वरुपात आहे.

२) प्रावरण (mantel): मध्यभागाकडुन वरची आवरणे बघताना, बाह्यगाभ्याच्या बाहेरील आवरणाला प्रावरण असे म्हणतात.  हे द्रव किंवा दगडासारखे कठिण नसुन प्लास्टीक सारखे मऊ आहे. हा मुख्यत्वे मॅग्नेशियम, लोह आणि सिलिकेट ह्या खनिजांपासुन बनलेले आहे.

३)शीलावरण (crust):  प्रावरणाच्या वरच्या म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या बाह्य आवरणाला शीलावरण असे म्हणतात. हे आवरण वेगवेगळ्या खनिजांपासुन तयार झालेल्या दगडांनी म्हणजेच शीलांपासुन बनलेले आहे.

अधीक माहीती साथी. (माहिती इंग्लिश मध्ये आहे, समजुन घेण्याचा प्रयत्न करावा.)
https://www.nationalgeographic.org/media/earths-interior/

अश्याप्रकारे भुगर्भात विवीध प्रकारची खनिजे प्रतेक आवरणात आढळतात. ही सर्व प्रकारची खनिजे जेंव्हा ज्वालामुखीच्या उद्रेकातुन बाहेर पडतात. तेव्हा ह्याच खनीजांपासुन दगड निर्माण होतात.

संदर्भ सुची:
1. निसर्ग शाळा,  पर्यावरणविषयक  उपक्रम , Oikos for ecological services , ग्राम मंगल
2. https://www.youtube.com/watch?v=h3Ti7FD1MUM
3. wikipedia
4. https://mr.vikaspedia.in/