यापुर्वीच्या भागात दगड कसा बनला हे आपण पाहीले, आता त्या पासुन मातीचा जन्म कसा झाला ते पाहुया.
दगड खनिजांपासुन बनला पण खनिज म्हणजे नेमकं काय ते पाहुया !
१. भारतातील खनिजांची तोंडओळख:
खनिज म्हणजे काय?.
आपली पृथ्वी ही अनेक मुलद्रव्यांनी बनलेली आहे. तिच्या प्रतेक आवरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुलद्रव्ये आहेत. पृथ्वीवरचे दगड हे विवीध मुलद्रव्यांनी बनलेले असतात.
हि मुलद्रव्ये दगडांमध्ये अशुध्द स्वरुपांमध्ये आढळतात. मानवाने वेगवेगळे धातु वआधातु मिळवण्यासाठी वेगवेगळ्या खाणी खणल्या आहेत. कारखान्यामध्ये हे अशुध्द स्वरुपातील खनिज विवीध प्रक्रिया करुन त्यापासुन वेगवेगळी मुलद्रव्ये धातु आणि अधातु स्वरुपात वेगळी केली जातात. आपण वापरत असलेल्या सर्व धातुच्या व काही अधातुच्या वस्तु बनवण्यासाठी बर्याच प्रमाणात जंगलतोड आणि खोदकाम केले जाते.
२. जमिनिच्या स्तरांचे निरिक्षण:
जमिनिचा छेद आक्रुति
या थरामध्ये आपल्याला कठिण दगड, छोटे दगड , दगडांचा भुगा, त्यानंतर काळी , लाल माती, व सगळ्यात वर पालापाचोळा, असे क्रमाने दिसते.
सगळ्यात वरचा थर हा मातीचाआहे. दगडांची झीज होवुन माती तयार होण्याच्या नैसर्गीक प्रक्रियेला बराच काळ लागतो. ऊन, पाऊस थंडी ह्या हवामानाच्या बदलांमुळे दगडांवर भेगा पडतात, भेगांमध्ये पाणी मुरुन , अनेक रासायनीक आणि भौतीक बदलांनी दगडापासुन मातीचा जन्म होतो. मातीचा २ से. मी चा थर व्हायला जवळ जवळ ५०० ते १००० वर्ष लागतात. मुलांनी स्वतः छोट्या दगडाने काळजीपुर्वक मोठा दगड फोडायचा निष्फळ प्रयत्न केला आहे.
मातीच्या सगळ्यात वरचा थर हा जैवीक थराचा असतो, ह्या थरामध्ये. झाडांचा पालापाचोळा , तुटलेल्या फांद्या, मेलेली झाडे व प्राण्यांचे अवशेष, त्यांची मल-विष्टा मिसळली जाते. हे सगळे जीवाणु आणी बुरशीच्या सहाय्याने कुजुन त्याचे विघटन होऊन त्याची परत माती् होते. ह्याप्रकारे मातीत जैवीक थर मिसळल्यामुळे माती चांगली कसदार व सम्रुद्ध होते. मातीत अश्या प्रकारे ह्युमस वाढल्याने सर्वच झाडांना चांगले पोषण मिळते. म्हणुनच जंगलातील माती जास्त सम्रुद्ध आणि जीवंतअसते. मातीत असलेले सुक्ष्म जीवाणु , असंख्य किडे , मुंग्या, गांडुळे ह्या सर्वांमुळे माती अधिक भुसभुशित होते. त्यामुळे मातितील औक्सिजन वाढतो. सर्व जीवांना आणि झाडांच्या मुळांना जे हीतकारकच असते. ह्या सगळ्यांमुळे आपली जमिन नांगरुन पण निघते आणि त्यात खत पण मिसळले जाते.
३. मातीचे प्रकार:
निरीक्षणाकरिता मुलांनी ह्या प्रतेक ठीकाणावरुन मुठभर माती आणली.
१. तळ्याकाठ्ची माती.
२. शेतातील माती
३.शाळेच्या आवारातील माती
४. रस्त्याच्या कडेची माती
५. माळरानाची माती
मुलांनी वरच्या मातीचे निरिक्षण करुन, तक्त्यामध्ये त्यांच्या नोंदी लिहिल्या.
निरिक्षण:
१. मातीचा रंग
२. वास
३. स्पर्श
४. मातीतील घटक- भिंगाने मातीतील घटकांकडे बघावे, छोटे दगड, मातीचे कण, वाळू, झाडांची मूळॆ, किडे, गांडुळ, बीया, छॊटे शंख, झाडांच्या पानांचे तुकडे
४. जमीन एक गाळण:
प्रयोग: मातीची पाणीधारणक्षमता
साहित्य: वाळू , चिकणमाती, शेतातली माती याचे नमुने . प्लास्टीकच्या ३ किंवा १ छिद्र असलेली बाटली प्रयोगाकरीता तयार ठेवावी. पाणी जमा करण्याकरता रिकामी भांडे, वेळ मोजण्यासाठी स्टॉपवॉच .
क्रुती: वर सांगितलेल्या बाटलीमध्ये प्रतेक वेळी मातीचा एक प्रकार घालुन प्रयोग करायचा आहे. प्रयोग सुरु करण्यापुर्वी स्टॉपवॉच चालु करुन माती भरलेल्या बाटलीमध्ये पाणी घालायचे आहे, खाली रिकामी भांडे ठेवुन त्यात किती पाणी पडले व त्याला किती वेळ लागला ह्या दोन नोंदी करुन आपल्याला तक्ता करायचा आहे.
या प्रयोगावरुन मुलांना मातीच्या विवीध प्रकारांची, पाणी धरुन ठेवण्याची क्षमता ही वेगवेगळी असते हे कळेल. ह्या प्रयोगातील मातीचे नमुने हे मातीच्या प्र्तेक कणांचे आकारमान वेगवेगळे असल्यामुळे झाला आहे. कणांच्या आकारमानामुळे त्यांचा पाणी धरुन ठेवण्याचा गुणधर्म कसा बदलतो हे ह्या प्रयोगातुन तडपाळुन पाहता येईल. मातीच्य ह्या पाण्याचा निचरा होणार्या किंवा पाणी धरुन ठेवणार्या ह्या गुणधर्माचा उपयोग करुन माणसांनी त्यानुसार विवीध झाडे लावणे ,पीक घेणे शिकले आहे.
मातीचे विवीध प्रकार त्यांच्या भुभागांप्रमाणे :
मुलांनी भुगोलामध्ये हे शिकले आहे कि प्रतेक ठिकाणचा भुप्रदेश हा त्या ठिकाणाला लाभलेल्या हवामानामुळे, त्याच्या स्ठानामुळे, तिथे आढळणार्या खडकांमुळे वेगवेगळा आहे.
आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगल्या भुभांगांकडे आणि तेथे आढळणार्या माती बद्दल जाणुन घेऊया.
महाराष्ट्रातील विवीध भुप्रदेश व तीथली माती :
समुद्र किनारा, - वालुकामय कोरडी
कोकणामध्ये -लाल माती
डोंगर/ देश / पठार /, - काळी माती---------- खनिजे- लोह, अल्युमिनीयम , मग्नेशियम
पठार(डोंगराळ- सह्याद्रीच्या डोंगराळ भाग व तीथली पठारे - लाल माती -खनिजे- लोह, अल्युमिनीयम
नदीकिनारी - गाळाची सुपिक माती.
मातीचा असा अभ्यास केला तर, आपल्या गावातील माती कशी आहे आणी का आहे हे कळेल. व या प्रकारामुळे आपल्या भागांमध्ये कोणकोणती झाडे छान येतील ते कळेल.
संदर्भ सुची:
1. निसर्ग शाळा, पर्यावरणविषयक उपक्रम , Oikos for ecological services , ग्राम मंगल
2. https://www.youtube.com/watch?v=h3Ti7FD1MUM
3. wikipedia
4. https://mr.vikaspedia.in/
Uttam mahiti
ReplyDelete